उद्याचे कळले, आजचे काय?

राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांचा वाढदिवस दर वर्षीपेक्षाही मोठ्या थाटात या वर्षी साजरा झाला. आपल्या आमदारकीच्या काळातील बहुतेक सर्व योजनांचा आढावा त्यांनी घेतला आणि भविष्याकरिता प्रामुख्याने काही कोटी रुपयांच्या पाणी योजना प्रस्तावित असल्याचे जाहीर केले. वाढदिवस हे केवळ निमित्त होते. विधानसभेची आगामी निवडणूक होण्यापूर्वीचा हा वाढदिवस असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व होते. त्या निमित्ताने विकासकामांचा आढावा घेणे अत्यंत समयोचित होते. पण…

पर्यटकांसाठी स्व-संरक्षणाचे सूत्र

नजरेत न मावणाऱ्या अथांग सागराच्या किनाऱ्यावरचा अनुभव स्वतःला विसरायला लावणाराच असतो. त्यातही किनारपट्टीच्या प्रदेशात वास्तव्य नसलेल्यांना तर या अनुभवाचे विशेष अप्रूप असते; मात्र थोड्याशा निष्काळजीपणामुळेही हा अनुभव जीवनाची अखेर करू शकतो, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. किनाऱ्यावर जीवरक्षक तैनात असणे, धोक्याच्या सूचनांचे फलक लावणे, दुर्घटना घडल्यास वैद्यकीय सेवा आणि अँब्युलन्ससह अन्य आपत्कालीन यंत्रणा सज्ज असणे आदी बाबी अपरिहार्यच आहेत; मात्र पर्यटकांनी स्वतः सावध असणे हे त्याहून किती तरी महत्त्वाचे आहे.

महिला, युवक, शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याची पंतप्रधानांची ग्वाही

विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (९ डिसेंबर) देशभरातल्या विविध ठिकाणच्या नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशभरात फिरणार आहे.

कोकण पर्यटनाचा कस्तुरीमृग

नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमुळे जो काही आढावा घेतला गेला, त्यातूनच कोकणातील सागरी किनाऱ्यांच्या नव्या पर्यटन क्षेत्रांची निश्चिती करायला हवी, तसा आराखडा तयार करायला हवा. त्यातून पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच कोट्यवधी रुपये खर्च करून साजरा झालेला नौदल दिन कोकणाच्या दृष्टीने सार्थकी लागेल.

नौदलाच्या गणवेशावर लवकरच शिवराजमुद्रेचे मानचिन्ह : नरेंद्र मोदी

मालवण : भारतीय नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित मानचिन्हांचा समावेश केला जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (४ डिसेंबर २०२३) येथे सांगितले.

Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

नौदल दिनानिमित्त आज (४ डिसेंबर २०२३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे. कार्यक्रम लाइव्ह पाहा पुढील लिंकवर…