लोकनेता ते विश्वनेता

नरेंद्र मोदी या संघस्वयंसेवकाने संघप्रचारक ते मुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते लोकनेता, लोकनेता ते भारतासारख्या खंडप्राय देशाचे पंतप्रधान आणि पंतप्रधान ते विश्वनेता, अशी थक्क करणारी वाटचाल गेल्या चार दशकांत केली आहे. या वाटचालीचा आढावा लोकनेता ते विश्वनेता या ग्रंथात साप्ताहिक विवेकतर्फे घेतला जाणार आहे.

कृषी कायदे मागे घेत असल्याची पंतप्रधान मोदी यांची घोषणा; पाहा व्हिडिओ

‘कृषी कायदे पूर्ण विचारांती, संसदेत चर्चा करूनच आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आणले होते; त्यांचं देशातल्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी स्वागतही केलं; मात्र बरेच प्रयत्न करूनही शेतकऱ्यांच्या काही गटांना ते पटलेच नाहीत. त्यामुळे कदाचित आमच्या तपस्येतच काही त्रुटी राहिली असावी, ज्यामुळे आम्ही सूर्यप्रकाशाइतकं ढळढळीत सत्य असूनही त्या शेतकऱ्यांना पटवू शकलो नाही. म्हणून आम्ही हे तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत,’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१९ नोव्हेंबर) गुरुनानक जयंतीचं औचित्य साधून केली.

करोनाप्रतिबंधक लसीकरणात देशाचा १०० कोटींचा टप्पा; लसीकरणाच्या आकडेवारीचे विश्लेषण

नवी दिल्ली : भारताने देशातल्या १०० कोटी नागरिकांचे कोविडप्रतिबंधक लसीकरण करण्याचा ऐतिहासिक टप्पा आज, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी गाठला आहे. या वर्षी १६ जानेवारी रोजी भारताचा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला होता. म्हणजेच अवघ्या १० महिन्यांत भारताने ही कामगिरी केली आहे.

एम-योग अॅ प जगभरात योगाचा विस्तार करणार – नरेंद्र मोदी

जगभरात योगाचा विस्तार करण्यात आणि वन वर्ल्ड, वन हेल्थच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यात मोठी भूमिका बजावू शकेल, असे एम-योग अॅप अस्तित्वात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने २१ जून २०२१ रोजी केलेल्या भाषणात केली.

राज्याचे सर्वच विषय पंतप्रधानांनी गांभीर्याने ऐकले, भेटीने समाधान – उद्धव ठाकरे

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सर्वच विषय पंतप्रधानांनी गांभीर्याने ऐकून घेतले. त्यांच्या भेटीने मी आणि माझे सहकारी समाधान आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.