गोपुरी आश्रमात विद्यार्थ्यांना सुलेखनाचे धडे

कणकवली : येथील अप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात राष्ट्र सेवा दल शिबिरातील विद्यार्थ्यांना जुवाठी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी सुलेखनाचे धडे दिले.

आईच्या आठवणीसाठी पंचवीस ग्रंथालयांचा संकल्प

आज मातृदिन साजरा करताना आईच्या आठवणीसाठी पंचवीस ग्रंथालये सुरू करण्याच्या संकल्पाची वाटचाल यथायोग्य सुरू आहे, याचा अभिमान वाटतो.

उशिरा सुचलेले शहाणपण

मोठे आंदोलन उभे राहिल्यानंतर प्रशासनाला आता स्थानिक ग्रामस्थांशी समन्वय साधण्याचा उपाय सुचला आहे. पण ही पश्‍चात बुद्धी म्हणता येईल. स्थानिक ग्रामस्थांना केवळ गृहीत धरले जाते. त्यांना समजून सांगण्याची आणि त्यांना समजावून घेण्याची भूमिका प्रशासन कधीच घेत नाही. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर प्रशासन धडपडत आहे, पण एकदा प्रशासनाच्या विरोधात मत झाले की ते पुन्हा प्रशासनाच्या बाजूने व्हायला खूप काळ जावा लागेल. त्यात वेगवेगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी आपापल्या राजकीय सोयीनुसार विविध मतमतांतरे प्रकट करत असतात.

पत्रकारांना हाकलण्याचा उद्दामपणा

आपल्यावरील अन्यायाविरुद्ध पत्रकार रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची शक्यता नाही आणि त्यांनी तसे ते केले तरी ते केवळ प्रतीकात्मक असेल. नेत्यांप्रमाणे त्यांच्या पाठीशी लोकांचा जमाव नसतो. पण तरीही लोकमत जागवण्याचे, नवी मते निर्माण करण्याचे काम माध्यमेच करू शकतात. दडपशाही करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकमत तयार करण्याचे कामही ही माध्यमे करू शकतात, याची जाणीव प्रशासनाने ठेवायला हवी. लोकप्रतिनिधी संभ्रम निर्माण करतात, माध्यमे समन्वय निर्माण करू शकतात. त्यांच्याशी प्रशासनाने समन्वयानेच वागायला हवे. त्यांना हाकलण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मुळावर येऊ शकतो.

प्रिंदावण येथे कै. सौ. सावित्री केरू गोंडाळ स्मृती ग्रंथालयाचे उद्घाटन

राजापूर : प्रिंदावण (ता. राजापूर) येथील मानवाडी येथे कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती ग्रंथालयाचे उद्घाटन सेवानिवृत्त सिटी सर्व्हे ऑफिसर विष्णु गुणाजी धुमाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वतः केलेला अभ्यासच विद्यार्थ्याला वाचवू शकेल : जगदीश पवार

राजापूर : स्वतः केलेला अभ्यासच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्याला वाचवू शकेल, असा विचार सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनिअर आणि माय राजापूर संस्थेचे अध्यक्ष जगदीश पवार यांनी मांडला.