दिशा मिळाली, लक्ष्य कोठे?

शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील नेते तर संपूर्ण जिल्हा शिवसेनामय करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. विविध व्यासपीठांवरून त्याचाच उल्लेख केला जात आहे. याचाच अर्थ भाजपाला एकही जागा देण्याची त्यांची मानसिकता नाही. खासदारपद शिवसेनेचेच आहे, असेही ठामपणे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याचा कितपत उपयोग होईल, हा प्रश्न आहे.

रत्नागिरीच्या आदित्य लिमयेची शिवगान स्पर्धेत राज्यस्तरासाठी निवड

रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सांस्कृतिक विभागातर्फे रत्नागिरीत शिवगान स्पर्धेची प्राथमिक फेरी आज पार पडली. स्पर्धेत आदित्य आनंद लिमये प्रथम आला असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

रत्नागिरीत भाजपतर्फे शिवगान स्पर्धेची प्राथमिक फेरी

रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सांस्कृतिक विभागातर्फे रत्नागिरीत शिवगान स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हा स्तरावर आणि अंतिम फेरी राज्यस्तरावर होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याची स्पर्धा जिल्हा नगर वाचनालयात स्पर्धा होईल. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या २५ स्पर्धकांनाच सहभागी होता येणार आहे.