अशोक प्रभू द्वितीय स्मृतिदिनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्ताने येत्या १३ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२३मध्ये केवळ १२ ते १५ टक्के आंबा उत्पादन; राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी : उदय सामंत

रत्नागिरी : आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (१२ एप्रिल २०२३) आढावा बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.

विश्व मराठी परिषदेतर्फे लेखक-प्रकाशक कार्यशाळा

पुणे : विश्व मराठी परिषदेने जीवनाचे व्यवस्थापन या विषयावर येत्या मंगळवारपासून (दि. २८ मार्च) चार दिवसांची ऑनलाइन मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे.

कोकणातील बागातदारांना यापुढे कृषी दराने वीज बिले

रत्नागिरी : कोकणातील आंबा, काजू, नारळ, चिकू बागायतदारांना आता कृषी दरानेच वीज बिले दिली जाणार आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे यासंदर्भात दिलेल्या प्रेझेंटेशनला यश आल्याची माहिती कोकण बिझिनेस फोरमचे संजय यादवराव यांनी दिली.

जीवनाच्या व्यवस्थापनाविषयी मोफत कार्यशाळा

पुणे : विश्व मराठी परिषदेने जीवनाचे व्यवस्थापन या विषयावर येत्या मंगळवारपासून (दि. २८ मार्च) चार दिवसांची ऑनलाइन मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे.

संज्योक्ती सुर्वे, विद्या पटवर्धन यांना बोडस ट्रस्टचे पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : बोडस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रत्नागिरी शहरातील विद्या मधुकर पटवर्धन यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार, तर सौ. संज्योक्ती संजय सुर्वे यांना कार्यगौरव पुरस्कार आज महिला दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला.