कथामालेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार रामचंद्र वालावलकर यांना प्रदान

माडखोल, सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांना ‘अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण’चा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार नुकताच माडखोल केंद्रशाळेत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या पुरस्कारांचे आज वितरण

कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टकडून विविध क्षेत्रातील व्यक्तींना आज, ७ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता कणकवलीत होणार आहे.

रत्नागिरीतील वीस पत्रकारांचा ५ लाखांचा अपघात विमा

रत्नागिरी : मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून २० हून अधिक पत्रकारांचा प्रत्येकी ५ लाखाचा अपघात विमा रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून काढण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार पुरस्कारांचे थाटात वितरण

रत्नागिरी : समाजप्रबोधन आणि विश्वासार्ह माहिती देण्याचे काम वृत्तपत्रे करत असून पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांनी आज केले.

थिबा राजवाड्याच्या परिसरात २१ आणि २२ जानेवारीला रंगणार आर्ट सर्कल संगीत महोत्सव

रत्नागिरी : आर्ट सर्कलतर्फे गेली १५ वर्षं थिबा राजवाड्याच्या परिसरात होणाऱ्या संगीत महोत्सवाच्या या वेळच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. २१ आणि २२ जानेवारी २०२३ असे दोन दिवस हा महोत्सव रंगणार आहे.

वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी कासव जन्मोत्सवाची चाहूल

मंडणगड : वेळास (ता. मंडणगड) येथील समुद्रकिनारी १५ नोव्हेंबर रोजी कासवमित्र देवेंद्र पाटील यांना वाळूमध्ये ऑलिव्ह रिडले सागरी कासवाचे या हंगामातील पहिले घरटे आढळले. त्यामुळे कासवाच्या जन्मोत्सवाची चाहूल लागली आहे. दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे यांनी वेळास येथील कासवमित्रांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.