रत्नागिरीत करोनाबाधितांमध्ये दहा जणांची भर; सिंधुदुर्गात दोन रुग्ण वाढले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज (१८ जून) सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत करोनाच्या दहा रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ४५९ झाली आहे. बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ३४३ असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७४.७२ टक्के झाले आहे. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्गात दोन नवे रुग्ण आढळले असून, तेथील एकूण रुग्णांची संख्या १५८ झाली आहे.

करोना रुग्णसंख्या : रत्नागिरी – ४४९, सिंधुदुर्ग – १५६

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ४४९ झाली आहे. त्यापैकी ३३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सिंधुदुर्गातील रुग्णसंख्या

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ४४५; सिंधुदुर्गात नवा रुग्ण नाही

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ जून) सायंकाळपर्यंत मिळालेल्या अहवालांनुसार करोनाबाधितांची संख्या ४४५ झाली आहे, तर दिवसभरात १९ जण बरे होऊन घरी गेल्याने करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३२० झाली आहे. सिंधुदुर्गात आज चार रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांत सिंधुदुर्गात नवा रुग्ण आढळलेला नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्क्यांवर

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीत तासांमध्ये मिळालेल्या करोनाविषयक अहवालांवरून जिल्ह्यात करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्के झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ४३१ असून, आतापर्यंत ३०५ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. दरम्यान, सिंधुदुर्गातही आज (१५ जून) १० जणांना घरी सोडण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात १६ नवे करोनाबाधित; सिंधुदुर्गात १६ जण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासून आज (१४ जून) सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत करोनाचे १६ रुग्ण वाढले असून, १२ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले, तर उपचारांदरम्यान ६७ वर्षांच्या एकाचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गात पाच नव्या रुग्णांची भर पडली असून, १६ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात २७९ जण करोनामुक्त; सिंधुदुर्गात आज नवा रुग्ण नाही

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ जून) दिवसभरात १९ जणांना करोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २७९ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात आज नवा करोनारुग्ण सापडला नसून, १२ जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे.