रत्नागिरी : प्रसिद्ध गायक-संगीतदार, नाट्यअभिनेते गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त संतरचित अभंग गायन स्पर्धा येत्या ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेचे आयोजन स्वराभिषेक-रत्नागिरी आणि पपू गगनगिरी महाराज भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.
