तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावणेसहा कोटीचे नुकसान

सिंधुदुर्गनगरी : तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच कोटी ७७ लाख ४५ हजार ११७ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये तौते चक्रीवादळाच्या लँडफॉलची प्रक्रिया सुरू

गेले दोन दिवस गोवा-कोकणाच्या समुद्रातून मुंबई-गुजरातच्या दिशेने निघालेल्या तौते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) लँडफॉलची (Landfall) म्हणजेच किनाऱ्यावर धडकण्याची प्रक्रिया गुजरातमध्ये सुरू झाली आहे. भारतीय हवामान खात्याने आज, १७ मे रोजी रात्री साडेआठ वाजता प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे.

रत्नागिरीत चक्रीवादळाने साडेतीन लाख ग्राहक अजूनही विजेविना; जिल्ह्यात किमान एक हजार घरांचे नुकसान

रत्नागिरी : अरबी समुद्रात रविवारी, १६ मे रोजी झालेल्या तौते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण कंपनीचे सर्वाधिक नुकसान झाले असून त्यामुळे सुमारे साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी युद्धपातळीवर झटत आहेत.

तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात ४४७ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

सिंधुदुर्गनगरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिवसभरात ४४७ घरांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

तौते चक्रीवादळाने गती बदलल्याने रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान

रत्नागिरी : अरबी समुद्रातून कोकण किनारपट्टीच्या समांतर वाटचाल करीत असलेल्या तौते चक्रीवादळाने गती बदलल्याने त्याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठी हानी झाली. या आपत्काळात पोलिसांनी रस्त्यावरची झाडे हटवून मोठे मदतकार्य केले.

तौते चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागांना फटका

रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेले तौते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात आंबोळगड परिसरात दुपारी दाखल झाले. या वादळामुळे राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यात जोरदार वादळी वारे वाहत आहेत.‌