‘‘मोडीदर्पण’मुळे घडतील मोडी लिपीचे नवे अभ्यासक’

मुंबई : ‘विस्मृतीत गेलेल्या मोडी लिपीला गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये आणि नवे मोडी अभ्यासक घडविण्यासाठी मोडीदर्पण दिवाळी अंक महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असे प्रशंसोद्गार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोडीदर्पण दिवाळी अंकाच्या प्रकाशनप्रसंगी काढले.

फिनोलेक्स, ‘मुकुल माधव’मुळे १७०० कुटुंबांची दिवाळी होणार आनंदमय

मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने समाजातील १७०० गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला जाणार आहे.

रत्नागिरीत पुढच्या वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया

रत्नागिरी : रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अनिश्चितता संपली आहे. येत्या २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (२९ ऑक्टोबर) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मा. दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय होणार

मुंबई : मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २८ सप्टेंबर २०२० रोजी राज्य सरकारतर्फे ही घोषणा करण्यात आली. अशा प्रकारचे हे देशातील पहिले संगीत महाविद्यालय असेल.

अंतिम वर्षाची परीक्षाप्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची सर्व प्रक्रिया येत्या ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आज (तीन सप्टेंबर) मुंबईत राजभवनात झालेल्या सर्व कुलगुरूंच्या बैठकीतील निर्णयाची माहिती त्यांनी दिली.

अंतिम वर्षाची परीक्षा घरी बसूनच देता येणार

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर न जाता घरी बसूनच परीक्षा देता यावी, अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे, असे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज (३१ ऑगस्ट) सांगितले.