रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे कार्य उत्तम – रवींद्र प्रभुदेसाई

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आपल्या ज्ञातिबांधवांनाच नव्हे तर समाजातील इतरही चांगल्या व्यक्तींना पुरस्कार देत आहे, हे कार्य उत्तम प्रकारे सुरू आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ उद्योजक आणि पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी काढले.

रवींद्र प्रभुदेसाईंच्या मार्गदर्शनाची रत्नागिरीच्या उद्योजकांना संधी

रत्नागिरी : पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शऩाची संधी रत्नागिरीतील उद्योजकांना रविवारी (दि. ११ डिसेंबर) उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या विविध पुरस्कारांचे वितरण रविवारी होणार असून त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रभुदेसाई उपस्थित राहणार आहेत.

स्वतःमध्ये बदल घडवून आणून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करावा – दांडेकर

रत्नागिरी : पुढची पिढी नेहमीच आपल्यापेक्षा पुढे आणि अद्ययावत असते. मात्र त्यांच्यासमोर चांगल्या आदर्शांची गरज आहे. आपण चांगले वागलो तरच हे शक्य आहे. आपण स्वतःपासूनच बदल घडवायला सुरवात केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सौ. रेणू दांडेकर यांनी केले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे २७ नोव्हेंबरला विशेष पुरस्कारांचे वितरण

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे २०२२ चा विशेष पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ येत्या रविवारी (दि. २७ नोव्हेंबर) होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ सौ. रेणू दांडेकर उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या विविध पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केली.

हिंदूंची ताकद एकीमध्येच – उदय गोविलकर

रत्नागिरी : ब्राह्मण आणि समस्त हिंदूंनीही एकत्र आले पाहिजे. आपली ताकद एकीमध्येच आहे, असे प्रतिपादन दापोलीच्या ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेचे संस्थापक, ब्राह्मण हितवर्धिनी सभेचे अध्यक्ष उदय गोविलकर यांनी केले.