जिल्हावासीयांना कडक टाळेबंदी; बाहेरील नागरिकांना पायघड्या; आठ दिवसांत रत्नागिरीबाहेरून आले नऊ हजार नागरिक

रत्नागिरी : करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एक जुलैपासून कडक लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यात पुढेही वाढ करण्यात आली; मात्र या लॉकडाउनमध्ये जिल्ह्याबाहेरील नागरिकांनाही प्रवेश देण्यास बंदी घालण्याच्या स्वतःच्याच धोरणाचा प्रशासनाला विसर पडला आहे. या आठ दिवसांत जिल्ह्याबाहेरून तब्बल आठ हजार ९०२ नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत.

सिंधुदुर्गात करोनाचे पाच नवे रुग्ण; एकूण संख्या २५०

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी पाच व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५० झाली आहे.

दीपगृह पर्यटन विकसित करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न

नवी दिल्ली : देशभरात असलेली सुमारे १९४ दीपगृहे ही पर्यटकांना आकर्षून घेणारी केंद्रे म्हणून विकसित करण्याबद्दल आज (सात जुलै) केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. दीपगृहांचा परिसर विकसित करण्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली.

राजापूर तालुक्यात वैद्यकीय अधिकारी आणि पत्नी करोनाबाधित

रत्नागिरी : काल (५ जुलै) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार राजापूरमधील एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीलाही करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत राजापूर शहरातील करोना रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. आता राजापूर तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ४२ वर गेली असून, राजापूर ग्रामीण रुग्णालयातील एकूण ३५ कर्मचाऱ्यांना आज क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

सिंधुदुर्गातील मच्छिमारांना सागरी सुरक्षेबद्दल ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : भारतीय तटरक्षक दल-रत्नागिरी, मत्स्य व्यवसाय विभाग-सिंधुदुर्ग आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांना सागरी सुरक्षेच्या दृष्टीने घावयाच्या काळजीबाबतची माहिती ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे देण्यात आली.