लांजा : कोट (ता. लांजा) गावातील दिवाळेवाडीतील बोलये आणि करंबेळे कुटुंबीयांनी एकत्र येऊन पंचक्रोशतील विद्यार्थी आणि भावी पिढीला दिशा देण्यासाठी गुरुकृपा वाचनालय सुरू केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
लांजा : कोट (ता. लांजा) गावातील दिवाळेवाडीतील बोलये आणि करंबेळे कुटुंबीयांनी एकत्र येऊन पंचक्रोशतील विद्यार्थी आणि भावी पिढीला दिशा देण्यासाठी गुरुकृपा वाचनालय सुरू केले.
तळवडे (ता. राजापूर) : राजापूर लांजा नागरिक संघाचे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन राजापूर तालुक्यातील तळवडे येथे ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी तळवडे नगरी सज्ज झाली आहे.
लांजा : तळवडे (ता. राजापूर) येथे होणार असलेल्या आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी राणी लक्ष्मीबाई क्रांती ज्योत फेरी काढण्यात आली. तिचा प्रारंभ कोट (ता. लांजा) येथे झाला. सरपंच सौ निशिगंधा नेवाळकर यांच्या हस्ते क्रांतीज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.
लांजा : आजच्या काळात महिला सक्षम झाल्या आणि त्या स्वतःचे संरक्षण करू शकल्या, तरच झाशीची राणी लक्ष्मीबाईंची जयंती साजरी करायला काही अर्थ आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेच्या प्रियंवदा जेधे यांनी व्यक्त केले.
हिरव्याकंच झाडांमध्ये विसावलेल्या रमणीय कोकणातील “द लँड ऑफ लेक” (तलावांची भूमी) म्हणून पुढे येणारा रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गसमृद्ध लांजा तालुका पर्यटन नकाशावर ‘लवेबल लांजा’ म्हणून आपली नवी ओळख करू पाहतो आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने अशा लांजा तालुक्याची ओळख.
लांजा : झाशीच्या राणीचे सासर असलेल्या कोट (ता. लांजा) गावात माचपठार कातळसड्यावर विपुल प्रमाणात कोरीव आणि देखण्या कातळशिल्पांचा समूह प्रकाशात आला आहे.