इन्फिगो आय केअरतर्फे रेटिनातज्ज्ञ राजापूर, देवरूखमध्ये

रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर या सुसज्ज हॉस्पिटलतर्फे रेटिनातज्ज्ञ आपल्या गावात उपक्रमाला आजपासून (दि. २६ मे) प्रारंभ झाला आहे.

रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत २७ एप्रिलपासून रत्नागिरीत

रत्नागिरी : मधुमेही रुग्णांच्या तपासणीसाठी रेटिना स्पेशालिस्ट डॉ. प्रसाद कामत येत्या २७ ते ३० एप्रिल या कालावधीत रत्नागिरीतील इन्फिगो हॉस्पिटलमध्ये तपासणी करणार आहेत.

मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रणात राखणे आवश्यक – डॉ. ठाकूर

रत्नागिरी : सध्याच्या करोनाच्या काळात ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार असतील, त्यांनी ते योग्य नियंत्रणात राहतील याची संपूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे, असा सल्ला इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी दिला आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीसह विविध नेत्रविकारांची तपासणी रत्नागिरीत २१ आणि २२ मे रोजी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘इन्फिगो आय केअर’मधील कर्मचाऱ्यांना करोनाविषयक प्रशिक्षण – डॉ. श्रीधर ठाकूर

रत्नागिरी : इन्फिगो ग्रुपच्या नेत्र रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना करोनाविषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. रुग्णालयातील शस्त्रक्रियाही सुरक्षेची काळजी घेऊन केल्या जातात. त्यामुळे रुग्णांनी करोनाला घाबरू नये, असे आवाहन इन्फिगो आय केअरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.

रत्नागिरीत तीन दिवस तिरळेपणावरील उपचार आणि शस्त्रक्रिया

रत्नागिरी : तिरळेपणावरील शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या डोळ्यांच्या समस्या, आळशी डोळे अशा सर्व विकारांवरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी रत्नागिरीच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. विनीतकुमार महाजनी येत्या सोमवारपासून (२९ मार्च) रत्नागिरीत येत आहेत. रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामतही याच काळात इन्फिगोमध्ये मधुमेही रुग्णांच्या रेटिनाची तपासणी करून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही करणार आहेत.

मधुमेहींच्या नेत्रविकारांसाठी रत्नागिरीत ५, ६ मार्चला विशेष तपासणी

रत्नागिरी : मधुमेही व्यक्तींना होणाऱ्या डायबेटिक रेटिनोपॅथीसह विविध नेत्रविकारांची तपासणी रत्नागिरीत ५ आणि ६ मार्चला होणार आहे. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे ही विशेष तपासणी केली जाणार असून जिल्ह्यातील मधुमेही नेत्ररुग्णांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.