रत्नागिरीत तीन दिवस तिरळेपणावरील उपचार आणि शस्त्रक्रिया

रत्नागिरी : तिरळेपणावरील शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या डोळ्यांच्या समस्या, आळशी डोळे अशा सर्व विकारांवरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी रत्नागिरीच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. विनीतकुमार महाजनी येत्या सोमवारपासून (२९ मार्च) रत्नागिरीत येत आहेत. रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामतही याच काळात इन्फिगोमध्ये मधुमेही रुग्णांच्या रेटिनाची तपासणी करून गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही करणार आहेत.

तिरळेपणामुळे अनेकांची संधी हुकते. लहान मुलांच्या तिरळेपणामुळे अनेक समस्या उद्भवतात. तरुण, तरुणींचे विवाह होत नाहीत. त्यामुळे तिरळेपणावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. त्यासाठीच डॉ. महाजनी रत्नागिरीत उपस्थित राहणार आहेत. डॉ. महाजनी यांनी तिरळेपणावरील हजारो शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. ते इन्फिगो आय केअरचे तज्ज्ञ डॉक्टर असून लहान मुलांचा दृष्टिदोष, तिरळे डोळे, आळशी डोळे अशा विविध आजारांची तपासणी करणार आहेत. सुदृढ आरोग्य असणार्याे रुग्णांवरही आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया या कालावधीत करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या पालकांची तयारी असेल तर तपासणीनंतर गरज भासल्यास शस्त्रक्रिया होणार आहे.

मुंबई, पुणे किंवा मोठ्या शहरांत तिरळेपणावरील शस्त्रक्रियेसाठी सुमारे ६० हजार रुपयांपासून अधिक खर्च येतो. परंतु रत्नागिरीत तीन दिवसांत इन्फिगोमध्ये सवलतीच्या दरात या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. काही शस्त्रक्रिया पुढील महिन्यात होतील. परंतु त्यासाठी या तीन दिवसांत तपासणी करून घेणे आवश्यक आहे, असे इन्फिगोचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी सांगितले.

रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत यांनी गेल्या सहा महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक मधुमेही रुग्णांच्या पडद्याची तपासणी केली आहे. जिल्ह्यात रेटिनातज्ज्ञ नसल्याने रुग्णांना मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर अशा मोठ्या शहरांत जावे लागत होते. परंतु डॉ. कामत येथे दर महिन्याला येत असल्यामुळे रेटिनाच्या गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या आहेत. भारतात सुमारे १५ टक्के मधुमेही रुग्ण आहेत. त्यातील निम्म्या रुग्णांच्या डोळ्यांच्या पडद्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गेल्या १० ते १५ वर्षांपासून ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी वर्षातून दोन वेळा रेटिना पडद्याची तपासणी करून घेतली पाहिजे. पडदा खराब झाल्याने दृष्टिनाश होतो, गुंतागुंत वाढते. पण वेळीच तपासणी केल्यास या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियासुद्धा आता रत्नागिरीत इन्फिगो आय केअरमध्ये करणे शक्य झाले आहे.

येत्या २९ ते ३१ मार्च या काळात तपासणीसाठी इन्फिगो आय केअर, साळवी स्टॉप, रत्नागिरी (संपर्क क्रमांक 9372766504) येथे संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. ठाकूर यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply