रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत २७ एप्रिलपासून रत्नागिरीत

रत्नागिरी : मधुमेही रुग्णांच्या तपासणीसाठी रेटिना स्पेशालिस्ट डॉ. प्रसाद कामत येत्या २७ ते ३० एप्रिल या कालावधीत रत्नागिरीतील इन्फिगो हॉस्पिटलमध्ये तपासणी करणार आहेत.

दैनंदिन कितीही काळजी घेतली तरीही बऱ्याच वर्षांपासून शरीरात असणारा मधुमेह आणि रक्तातील अनियंत्रित साखर डोळ्यासारख्या महत्वाच्या अवयवाचे नुकसान करत असते. मधुमेही रुग्णांमध्ये विशेषकरून रक्तातील अनियंत्रित साखरेचा परिणाम म्हणून दृष्टी पटल किंवा रेटिनाला सूज येणे, पडद्यावर रक्तस्राव होणे, पडद्याला छिद्र पडणे यासारख्या समस्या उद्धवण्याची शक्यता काळानुसार उत्पन्न होते. मधुमेही रुग्णांनी वर्षातून किमान दोनदा डोळ्यांची तपासणी करून घेतली तर या समस्या वेळीच लक्षात येतात. अशा समस्यांवर वेळीच उपचार केले, तर रुग्णांचा बराचसा त्रास, पैसा व मधुमेहामुळे होणारा दृष्टीनाश लांबवता येतो किंवा आटोक्यात आणता येतो. वेळीच उपचार केले नाहीत, तर त्यावरील उपचारांवर भरपूर पैसे खर्च झाल्याने ती व्यक्ती व कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो. मधुमेही रुग्णांनी हे सतत लक्षात ठेवले पाहीजे की प्रत्येक १५ मधुमेही व्यक्तींपैकी ७ ते ८ जणांना डोळ्यांच्या पडद्याचे आजार व त्यामुळे गंभीर दृष्टिनाश होण्याची शक्यता सर्वाधिक असते. ती कधीही संपूर्णपणाने बरी करता येत नाही. वेळोवेळी उपचार करून फक्त नियंत्रणात ठेवावी लागते.

इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये ग्रीन लेझर, डायमेन्शनल ऑप्टिकल टोपोग्राफी, फिल्ड अॅनालायझर, अर्टली मशीन अशी अत्याधुनिक निदान यंत्रणा असून याद्वारे रेटिनाच्या समस्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने तपासणी केली जाते. हा विभाग रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील एकमेव सुसज्ज विभाग आहे.

येत्या २७ ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत डॉ. कामत रेटिनाच्या रुग्णांची तपासणी सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत करणार आहेत. डॉ. कामत चेन्नईच्या शंकर नेत्रालयातील उच्च प्रशिक्षित तज्ज्ञ असून त्यांनी आजपर्यत मुंबई, पुणे, नागपूर, कोलकाता, चेन्नई, इंदूर, जबलपूर, पटना, रांची, अहमदाबाद, सुरत येथील हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत. २० हजारहून अधिक डोळ्यांच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. डॉ. कामत इन्फिगो हॉस्पिटलमध्ये पूर्वनोंदणीनुसार उपलब्ध असतील. रुग्णांनी नावनोंदणी करण्यासाठी ९३७२७६६५०४ या मोबाइलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply