मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रणात राखणे आवश्यक – डॉ. ठाकूर

ते म्हणाले, दैनंदिन कितीही काळजी घेतली तरीही बरेच वर्षांपासून शरीरात असणारा मधुमेह आणि अर्थातच रक्तातील अनियंत्रित साखर ही डोळ्यांसारख्या महत्त्वाच्या अवयवाचे नुकसान करत असते. मधुमेही रुग्णांमध्ये विशेष करून रक्तातील अनियंत्रित साखरेचा परिणाम म्हणून डोळ्यांतील दृष्टिपटल किंवा रेटिना याला सूज येणे, पडद्यावर रक्तस्राव होणे, पडद्याला छिद्र पडणे यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यतता काळानुसार उत्पन्न होतात. परंतु आपल्या डोळ्यांची रेटिनाच्या तज्ज्ञांकडून मधुमेही रुग्णांनी वर्षातून किमान दोनदा तपासणी करून घेतली तर या समस्या वेळीच लक्षात येतात. अशा समस्यांवर वेळीच उपचार केले, तर रुग्णांचा बराचसा
त्रास, पैसे आणि मधुमेहामुळे होणारा दृष्टिनाश लांबवता येतो किंवा आटोक्यात आणता येतो. मधुमेही रुग्णांनी हे सतत लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक १५ मधुमेही व्यक्तींपैकी ७ ते ८ जणांना डोळ्यांच्या पडद्याचे आजार आणि त्यामुळे गंभीर दृष्टिनाश होण्याची शक्य ता सर्वाधिक असते. मधुमेहामुळे होणारा दृष्टिनाश आणि डोळ्यांची हानी कधीही संपूर्णपणाने बरी करता येत नाही. वेळोवेळी उपचार करून ती फक्त नियंत्रणात ठेवावी लागते.

रत्नागिरीच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये ग्रीन लेझर, ३ डायमेन्शनल ऑप्टिकल टोपोग्राफी, फिल्ड अॅनालायझर, अर्टली मशीन अशी अत्याधुनिक निदान यंत्रणा असून याद्वारे रेटिनाच्या समस्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपासणी केली जाते. हा विभाग रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील एकमेव सुसज्ज विभाग आहे. तेथे येत्या २१ आणि २२ मे रोजी इन्फिगोचे सुप्रसिद्ध रेटिना तज्ञ्त डॉ. प्रसाद कामत रेटिनाच्या रुग्णांची तपासणी दिवसभर करणार आहेत. डॉ. प्रसाद कामत हे चेन्नईच्या शंकर नेत्रालयातील उच्च प्रशिक्षित रेटिना तज्ज्ञ असून त्यांनी आजपर्यंत मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, नागपूर, रांची, लखनौ, पाटणा येथील हजारो रुग्णांवर रेटिनाचे उपचार केले असून २० हजाराहून अधिक डोळ्यांच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. डॉ. प्रसाद कामत रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये मधुमेहाशी संबंधित रेटिनाच्या रुग्णांना २ दिवस पूर्वनोंदणीनुसार उपलब्ध असतील.

रुग्णांनी नावनोंदणीसाठी ९३७२७६६५०४ या क्रमांकावर संपर्क साधावा. सध्याच्या करोनाप्रतिबंधक लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे कोणाला प्रवासासाठी आवश्यक पत्राची गरज असल्यास नावनोंदणी केल्यावर इन्फिगोकडून प्रवासासाठी आवश्यक पत्र त्वरित पाठवले जाईल, असे इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे डॉ. ठाकूर यांनी कळविले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply