रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा करोनामुक्त अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ मे) करोनाचे नवे ३४५ रुग्ण आढळले, तर ४०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक होती.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ७७, दापोली ११, खेड ५८, गुहागर १८, चिपळूण ५० आणि राजापूर २ (एकूण २१६). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी २, गुहागर २ आणि संगमेश्वर ४. (एकूण ८). (दोन्ही मिळून २२४). कालच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण १२१. (सर्व मिळून ३४५).

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३० हजार ९४० झाली आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ५०५ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी ८८६ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ४८ हजार ८५७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ४०१ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २५ हजार ४९१ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८२.३८ टक्के आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे ३ आणि आजचे १२ अशा १५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी दोघांचा मृत्यू खासगी रुग्णालयांत, तर १३ जणांचा शासकीय रुग्णालयात झाला आहे. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ९४४ झाली असून मृत्युदर ३.०५ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी २६७, खेड १०३, गुहागर ४०, दापोली ८२, चिपळूण १८७, संगमेश्वर १३२, लांजा ५५, राजापूर ६८, मंडणगड १०. (एकूण ९४४).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply