सिंधुदुर्गात नवे २२५ रुग्ण, जिल्ह्यात २२०० जणांना बुधवारी मिळणार लस

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१८ मे) नवे २२५ करोनाबाधित रुग्ण आढळले. आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५३२, तर आतापर्यंत एकूण १४ हजार ८०४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. दरम्यान, बुधवारी, १९ मे रोजी २२०० जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे.


पुन्हा तपासणी केलेल्या १८ रुग्णांसह आज सापडलेल्या रुग्णांची संख्या २२५ आहे. आजच्या नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता २० हजार ४५७ झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ७, दोडामार्ग २६, कणकवली – ५७, कुडाळ – ६५, मालवण – १४, सावंतवाडी – २९, वैभववाडी – १, वेंगुर्ले – २५, जिल्ह्याबाहेरील – १.

जिल्ह्यात सर्वाधिक १०४८ सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात, तर त्याखालोखाल ८४५ रुग्ण सावंतवाडी तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ६९८, दोडामार्ग ४०८, कणकवली ६३८, मालवण ७४०, वैभववाडी १२२, वेंगुर्ले ६१३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २४. सक्रिय रुग्णांपैकी ३५९ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी ३१४ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ५११ झाली आहे. आजच्या मृतांचा तपशील असा – कणकवली ४, कुडाळ १, मालवण ३, सावंतवाडी २, वेंगुर्ले १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या तालुकानिहाय मृत्यूची एकूण संख्या अशी – देवगड ५७, दोडामार्ग – १५, कणकवली – १११, कुडाळ – ७८, मालवण – ७५, सावंतवाडी – ९४, वैभववाडी – ४०, वेंगुर्ले – ३९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.
…………

जिल्ह्याला कोव्हॅक्सिन लशीचे २२०० डोस

सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता कोव्हॅक्सिनचे दोन हजार २०० डोस प्राप्त झाले आहेत. ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेला आहे, त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्याकरिता राखीव आहे. तौते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यातील विद्युत सेवा आणि इंटरनेटसेवा काही ठिकाणी ठप्प झाल्याने कोविड लसीकरण सत्राचे पुनर्नियोजन करण्यात आले आहे. या लसीकरण सत्रामध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस दिला जणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यापैकी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांनाही यावेळी दुसरा डोस दिला जाणार आहे. ज्या नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देय आहे, त्यांनी उद्या, १९ मे रोजी लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायरयांनी केले आहे.

केंद्रावर पुढीलप्रमाणे लस उपलब्ध होईल. कणकवली तालुक्यात कासार्डे येथे १६०, देवगड तालुक्यात जामसंडे येथे १६०, कुडाळ तालुक्यात माणगाव येथे १६०, जिल्हा रुग्णालयात १६०, सावंतवाडी तालुक्यात बांदा येथे १६० याप्रमाणे एकूण ८०० डोस उपलब्ध असणार आहेत. त्याशिवाय उपजिल्हा रुग्णालय-कणकवली आणि जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी येथे प्रत्येकी कोविशिल्डचे ५० डोस उपलब्ध असतील.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply