करोना चाचणीची प्रयोगशाळा रत्नागिरीत सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील विषाणू प्रयोगशाळा म्हणजेच करोनाविषयक चाचणीची तपासणी करणारी प्रयोगशाळा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) ९ जून रोजी दुपारी मुंबईतून रिमोट कंट्रोलद्वारे या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले.

रत्नागिरीत आतापर्यंत १७३ रुग्ण बरे होऊन घरी; सिंधुदुर्गात २२ जणांची करोनावर मात

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (आठ जून) दिवसभरात सहा करोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत घरी सोडलेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १७३ झाली आहे. रत्नागिरीत आत्ता १७७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली असून, १०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात विकसित करण्यात आलेल्या अद्ययावर विषाणू प्रयोगशाळेचे उद्घाटन उद्या (नऊ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे.

करोना : रत्नागिरीतील रुग्णसंख्या ३६१, सिंधुदुर्गात १२१ रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या आज (सात जून) दिवसभरात १८ने वाढली असून, ती आता ३६१ झाली आहे. आज सकाळी १२, तर सायंकाळी सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज दिवसभरात आठ जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, सिंधुदुर्गातील रुग्णसंख्या १२१वर पोहोचली आहे.

महामानवाच्या स्मारकाने दिला अनेकांना आधार

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला. त्यात मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यांचा समावेश आहे. घराची छपरे उडून जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाने गावातील अनेक कुटुंबांना आधार दिला.

रत्नागिरीत आज एकही नवा करोनारुग्ण नाही; सिंधुदुर्गाची संख्या ११६

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (सहा जून) एकाही नव्या करोनाबाधिताची नोंद झाली नाही. बरे झालेल्या ३० बाधितांना आज घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील सर्वाधिक २३ करोनाबाधित गावे (कन्टेन्मेंट झोन) संगमेश्वर तालुक्यात आहेत. दरम्यान, सिंधुदुर्गातील रुग्णांची संख्या ११६ झाली असून, आतापर्यंत १७ जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रत्नागिरीची करोना रुग्णसंख्या ३४३; सिंधुदुर्गने शंभरी ओलांडली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज (पाच जून) जिल्ह्यात नऊ नव्या करोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ३४३वर पोहोचली आहे. त्यापैकी १२९ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले असून, आतापर्यंत १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल (चार जून) आठ नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा १०५ झाला आहे.