‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

चिपळूण : मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे ख्यातनाम अभ्यासक आशुतोष बापट यांनी लिहिलेल्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (दि. २ एप्रिल) येथील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

चारशे वर्षांपूर्वीची मूर्ती चिपळूणच्या वस्तुसंग्रहालयात दाखल

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तुसंग्रहालयात चारशे वर्षांपूर्वीची एक मूर्ती दाखल झाली आहे. त्यामुळे वस्तुसंग्रहालयात मोलाची भर पडली आहे.

बालकुमारांनी जास्तीत जास्त शुद्ध मराठी लिहावे, बोलावे

चिपळूण : मराठीची तोडफोड न करता जास्तीत जास्त शुद्ध मराठी बोलण्याचे आणि लिहिण्याचे आवाहन बालकुमारांना करण्यात आले.

काळानुरूप बदल स्वीकारत लोककलांचे भवितव्य उज्ज्वल : डॉ. मुकुंद कुळे

चिपळूण : ‘नागर आणि अनागर ह्या समांतर जीवनशैली आहेत. त्या दोन्ही एकत्र चालणार आहेत. त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत राहणार आहे. नागर कलांना साचेबद्धता असते. याउलट अनागर लोककलांमध्ये गतिमानता आणि लवचीकता असते. काळानुरूप बदल स्वीकारू शकणाऱ्या या लोककलांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत मुक्त पत्रकार आणि लोककलांचे अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी व्यक्त केले.

‘लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या स्त्री गीतांचा अनमोल ठेवा जपायला हवा’

चिपळूण : ‘स्त्री गीते हे उपमांचे भांडार आहे; विधी, श्रम अणि खेळ या अनुषंगाने स्त्री गीतांमध्ये नृत्यही येते. ही गीते इतिहास, समाज, नाती-गोती याची महती सांगणारी असून, लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या स्त्री गीतांचा हा अनमोल ठेवा जपायला हवा,’ असा सूर ‘लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती’ या परिसंवादातून उमटला.

संपूर्ण कोकणातील लोककलांचे दस्तावेजीकरण आवश्यक : माधव भांडारी

चिपळूण : मनोरंजनातून लोकप्रबोधन हा सर्वच लोककलांचा मूळ गाभा असल्यामुळे केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे, तर डहाणूपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व कोकणातील लोककलांचे दस्तावेजीकरण होणे आवश्यक आहे, असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि ज्येष्ठ लेखक माधव भांडारी यांनी व्यक्त केले.