रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ जुलै) रात्रीपर्यंतच्या २४ तासांत मिळालेल्या अहवालांनुसार २६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८७७ झाली आहे. चिपळूण येथील एका ७२ वर्षीय रुग्णाचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३१ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे पाच रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या २५८ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज नव्याने सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – रत्नागिरी ३, संगमेश्वर २, कामथे ४, दापोली २, गुहागर २, रायपाटण २, कळंबणी ६, लांजा १, मंडणगड ४.
आज ४२ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१२ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ७० टक्के झाले आहे. आज बरे झालेल्यांमध्ये दापोलीतील १२, घरडा येथील १४, रत्नागिरीतील ११ आणि समाजकल्याण (रत्नागिरी) येथील पाच आहेत.
जिल्ह्यातील आतापर्यंत ३१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नऊ रुग्ण गृह विलगीकरणात असून, तिघे इतर जिल्ह्यांत उपचारासाठी गेले आहेत. जिल्ह्यात सध्या ७५ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आज पाच नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील दोन, तर सावंतवाडी, मालवण आणि देवगड या तालुक्यांतील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २५८ झाली आहे. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून, एक जण मुंबईत उपचारांसाठी गेला आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील २०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
…….
