करोना काळात दोन लाखांहून अधिक चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक कडक लॉकडाउन आणि त्यानंतर शिथिल झालेले नियम यांचा आधार घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाखांहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या करोनाविषयक प्रसिद्धीपत्रकात आज (२२ जुलै) ही माहिती देण्यात आली आहे.

परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात कालपर्यंत (२१ जुलै) एकूण दोन लाख ८७६ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. याच काळात रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत, तसेच इतर जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या एक लाख ७३२ झाली आहे.

परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून २१ जुलैपर्यंत एक लाख ४२ हजार ५४९ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

(जिल्हावासीयांना टाळेबंदी, बाहेरच्यांना पायघड्या : हे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply