रत्नागिरी : आज (२२ जुलै) रात्री संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ७० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या १३७९ झाली आहे. तसेच आज दिवसभरात जिल्ह्यातील चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ४६ झाली आहे. सिंधुदुर्गातील एकूण रुग्णांची संख्या २८५वर पोहोचली आहे.
आज संध्याकाळपर्यंत सापडलेल्या २७ रुग्णांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी – ११ रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ८, दापोली – ४, गुहागर – १, घरडा, खेड – ३.
आज (२२ जुलै) रात्री साडेनऊनंतर मिळालेल्या माहितीनुसार, ४३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तपशील असा – कामथे १९, रत्नागिरी १९, दापोली दोन, घरडा तीन
बुरोंडी (दापोली) येथील एका ६० वर्षांच्या, तसेच माजळ (ता. लांजा) येथील ५६ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तसेच, राजापूर येथील एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारांदरम्यान आज मृत्यू झाला. रत्नागिरी येथे १७ जुलैला अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या ६८ वर्षीय महिलेचाही आज मृत्यू झाला. त्यामुळे आज दिवसभरात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या चार झाली असून, जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ४६ झाली आहे.
आज बरे झालेल्या ४५ रुग्णांना घरी पाठवण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ८१३ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालयातील ४, संगमेश्वर ५, उपजिल्हा रुग्णालय, कामथे १, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण १, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, खेड १, आणि कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे, चिपळूण येथील ३३ जणांचा समावेश आहे. आता रुग्णालयात ४७९ जण उपचार घेत असून, त्यात आज रात्री ४३ जणांची वाढ झाली आहे.
आज राजापूरकर कॉलनी, रत्नागिरी, शेट्ये नगर, रत्नागिरी, पानवल बौद्धवाडी, रत्नागिरी, बौद्धवाडी सोमेश्वर, रत्नागिरी, शेलारवाडी सोमेश्वर, रत्नागिरी, रामेश्वरवाडी नाखरे, रत्नागिरी ही क्षेत्रे करोना विषाणूबाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात सध्या १०५ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, त्याचा तपशील असा – रत्नागिरी तालुक्यात २३, दापोली ७, खेड २४, लांजा ६, चिपळूण ३३, मंडणगड ३, गुहागर ६, राजापूर तालुक्यात ३. मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांची संख्या १७ हजार १४८ आहे.
