निवळीतील कै. यशवंतराव माने विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी तिठा येथील कै. यशवंतराव माने माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. जान्हवी विनायक गावडे (९३.४० टक्के), प्रथम प्रकाश रावणंग (८९.४० टक्के), वृषिकेत विवेक मुळ्ये (८७.२०), श्रेया शंकर रावणंग (८६.४०), संदेश सहदेव तांबे (८५) यांनी पहिले पाच क्रमांक पटकावले. जान्हवी गावडे हिला मराठी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळाले आहेत.

१९९७मध्ये कै. यशवंतराव माने माध्यमिक विद्यालय सुरू झाले. यंदा दहावीची विसावी तुकडी परीक्षेला बसली. यात ४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व जण उत्तीर्ण झाले. १६ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी आणि २३ जणांना प्रथम श्रेणी मिळाली. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पांडुरंग पाचकुडे, नंदकुमार पाटील, सौ. संघमित्रा कुरतडकर, सचिन पावसकर, धनाजी पाटील, बाबा कीर, श्री. केळकर, श्री. गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार बाळासाहेब माने यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

प्रोफिशियंट अॅकॅडमीच्या वेबसाइटला नक्की भेट द्या : https://bit.ly/30tD3uz

Leave a Reply