रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज ३९ नवे करोनाबाधित सापडले असून, ५६ रुग्णांना करोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ नवे करोनाबाधित सापडले असून, १४ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २४) ५६ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालयातील ३, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय २, कामथे उपजिल्हा रुग्णालय १, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण ८, देवधे, लांजा १, घरडा १२, पेढांबे, चिपळूण २५, माटे हॉल, चिपळूण येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या २१७४ झाली आहे.
दरम्यान, आज आणखी ३९ करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ४, ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी ३, कळंबणी १७, चिपळूण १५.
आजच्या ३९ जणांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३४४४ झाली आहे. आतापर्यंत २५२१७ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यातील २१७६१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सर्वाधिक ४० जण रत्नागिरी तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल २५ जण चिपळूणमधील, २१ जण दापोलीतील, १२ जण खेडमधील आहेत. इतर तालुक्यातील मृतांची संख्या एकआकडी आहे. त्याचा तपशील असा – गुहागर ४, संगमेश्वर ९, लांजा २, राजापूर ७, मंडणगड १.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ११४९ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. संस्थात्मक विलगीकरणात १११ जण असून, १५ हजार ७९ जण गृह विलगीकरणात आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ५२३ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २५ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंतच्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ९६२ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात १३२ ठिकाणी कंटेन्मेंट झोन असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
