साप्ताहिक कोकण मीडिया – गणेशदर्शन विशेषांक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे आणि ते पोस्टाने पाठवणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे २८ ऑगस्ट २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/1vi02ht येथे क्लिक करा. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरही उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या ई-मॅगझिन्स विभागात मागील अंकही उपलब्ध आहेत. ते वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.

२८ ऑगस्टच्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : कोकण विकासाचे नवे प्रदूषणविरहित स्वप्न http://kokanmedia.in/2020/08/28/skmeditorial28aug/

‘करोना काळात आम्ही साजरा केलेला गणेशोत्सव’ या विषयावर कोकण मीडियाने वाचकांकडून माहिती मागवली होती. त्याला प्रतिसाद म्हणून अनेकांनी आपल्या भावना आणि आपल्याकडच्या गणपतीबाप्पाची छायाचित्रे पाठविली. बोरीवली (मुंबई), ताम्हाणे (राजापूर), सोवेली (मंडणगड), कसबा (संगमेश्वर), केळ्ये (रत्नागिरी), शिरगाव (रत्नागिरी), आचरा (मालवण), कणकवली, कऱ्हाड यांसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांतील घरगुती गणेशोत्सवाचे फोटो, तसेच माहिती या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गोमय गणेशाच्या १०० मूर्तींची पुढील वर्षाकरिता मागणी – मळगाव (सावंतवाडी) येथील कलाशिक्षक आणि मूर्तिकार विलास मळगावकर यांनी यंदा गोमय अर्थात गाईच्या शेणापासून सुबक, पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या. या प्रयोगाचे स्वागत झाले असून, पुढील वर्षासाठी १०० मूर्तींची मागणी नोंदवण्यात आली आहे. या अनोख्या प्रयोगाविषयी सविस्तर वृत्तांत…

गावच्या घराची सजावट करून मुंबईत आणला गणपती : सौ. शलाका सुधांशु नागवेकर यांचा लेख

गणेशोत्सवाचा आनंद १०० टक्केच : कणकवलीतील वैजयंती विद्याधर करंदीकर यांचा लेख

ऑनलाइन आरती सातासमुद्रापार : आचरा येथील सुरेश ठाकूर यांचा लेख

माझी करोनागिरी : करोना होऊन त्यावर मात केलेले डॉ. शिवदीप सुनीत कीर यांनी त्यांच्या अनुभवावर लिहिलेला लेख

शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाल्याने भावी पिढ्यांचा पाया कमजोर : ‘करोना डायरी’त किरण आचार्य यांचा लेख…
….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply