दासबोधातील श्री गणेशस्तवन (श्लोक १२वा)

भाद्रपद शुद्ध द्वादशी, शके १९४२

॥ श्रीराम ॥
मुर्डीव शुंडादंड सरळे ।
शोभे अभिनव आवाळें ।
लंबित अधर तिक्षण गळे ।
क्षणाक्षणा मंदसत्वी ॥ १२ ॥

अर्थ : एखाद्या सोट्यासारखी त्याची सोंड कधी सरळ तर कधी मुरडलेली, गुंडाळलेली असते. कपाळावर दोन आवाळे छान दिसतात. खालचा ओठ लोंबलेला असतो आणि उग्र गंध असलेला मद क्षणाक्षणाला थोडा थोडा गळतो.

…….

१९ ऑगस्ट २०२०पासून भाद्रपद महिना सुरू झाला आहे. हा महिना गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. त्यात ३० श्लोक आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने, त्यातील एकेक ओवी महिनाभर दररोज कोकण मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. सोबत त्याचा सोप्या भाषेतील अर्थही देण्यात येत आहे. गणेशस्तवनातील आधीचे श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

……….

एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply