रत्नागिरी : रत्नागिरीत नव्याने सुरू झालेल्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये १८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी डोळ्यांची मोफत तपासणी केली जाणार आहे .
करोना लॉकडाउनमुळे शाळा सध्या बंद आहेत. त्या लवकर सुरू होण्याची शक्यता नाही; मात्र या काळात गावोगावी ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे; मात्र मुळातच गेम आणि इतर कारणांसाठी मुले मोबाइलचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. त्यात आता शालेय शिक्षणाची भर पडली आहे. अशा स्थितीत मुलांच्या डोळ्यांना इजा पोहोचू शकते. मुले शाळेत जाण्यापूर्वी त्यांच्या डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक असते. त्यानंतर दर वर्षीही डोळ्यांची तपासणी केली तर त्यांची दृष्टी चांगली राहू शकते. त्याचबरोबर नियमित तपासणी केल्यामुळे मुलांना तिरळेपणा किंवा डोळ्यांचे इतर आजार असतील तर त्याचाही शोध घेता येतो.
याच दृष्टिकोनातून मुलांच्या डोळ्यांबाबत जनजागृती व्हावी, याकरिता रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे १० ऑक्टोबर २०२०पर्यंत १८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांची मोफत नेत्रतपासणी केली जाणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन इन्फिगो आय केअरतर्फे करण्यात आले आहे.
ठिकाण : इन्फिगो आय केअर हॉस्पिटल,
शॉप नं. ३/४/५, शांतादुर्ग संकुल,
साळवी स्टॉप, मेन रोड, रत्नागिरी
नावनोंदणीसाठी संपर्क क्रमांक : 9372766504
(लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजाराविषयी आणि ते होऊ नयेत म्हणून कशी खबरदारी घ्यावी, याविषयी इन्फिगो हॉस्पिटलमधील बालनेत्ररोगतज्ज्ञ दीपक देशपांडे यांनी दिलेली माहिती पाहा सोबतच्या व्हिडिओमध्ये…)