रत्नागिरीत ६५, तर सिंधुदुर्गात ८३ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (तीन ऑक्टोबर) करोनाचे नवे ६५ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७६३१ झाली आहे. सिंधुदुर्गात आज नवे ८३ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ४०११ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – खेड १, गुहागर २, चिपळूण ९, संगमेश्वर ८, रत्नागिरी १६, लांजा ३ (एकूण ३९). रॅपिड अँटिजेन टेस्ट – खेड २, गुहागर २, चिपळूण ६, संगमेश्वर २, रत्नागिरी १३, राजापूर १ (एकूण २६) (दोन्ही मिळून ६५)

आज ८३ रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत ६५३८ जणांनी करोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ८५.६७ टक्के झाला आहे. सध्या ७०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ३७ हजार ७४ जणांच्या चाचण्या झाल्या आहेत.

आज करोनाच्या एका रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २७० झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.५३ टक्के राहिला आहे. चिपळूणमधील ६० वर्षांच्या पुरुषाचा आज शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ७४, खेड ४५, गुहागर १०, दापोली २९, चिपळूण ६७, संगमेश्वर २४, लांजा ९, राजापूर १०, मंडणगड २ (एकूण २७०).

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३ ऑक्टोबर) आणखी ८३ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४०११ झाली आहे. आतापर्यंत २८९७ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप २११ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ९७ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ३६२६ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply