‘इन्फिगो’तर्फे बचत गटातील महिलांची मोफत नेत्रतपासणी

रत्नागिरी : इन्फिगो आय केअर या रत्नागिरीतील डोळ्यांच्या हॉस्पिटलतर्फे नाचणे गावातील बचत गटातील महिलांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.

मुंबईसह राज्यभरात सुरू झालेल्या इन्फिगो या नेत्र रुग्णालय साखळीतील पंधरावे रुग्णालय रत्नागिरीत सुरू झाले आहे. नेत्रोपचारांबरोबरच समाजातील सर्व घटकांमध्ये डोळ्यांविषयी जागृतीचे समाजसेवी काम या रुग्णालयातर्फे सुरू करण्यात आले आहे. नाचणे येथील शिवसागर ग्रामसंघ आणि श्री साई सेवा मित्र मंडळाच्या सहकार्याने नाचणे गावातील बचत गटातील महिलांचे मोफत नेत्रतपासणी शिबिर पार पडले.

करोनाच्या या काळात लोक दवाखान्यात जायला टाळत असतात. ते लक्षात घेऊन लोकांची अडचण समजून घेऊन मोफत शिबिरे घेण्याचा मानस रुग्णालयाचे संपर्क अधिकारी श्री. पावसकर आणि श्री. आंब्रे यांनी व्यक्त केला. त्यानंतर श्री साई सेवा मित्र मंडळाच्या सहकार्याने शिवसागर ग्रामसंघातील बचत गटातील महिलांसाठी शिबिर आयोजित करण्याचे ठरले. त्यानुसार आज (११ ऑक्टोबर) झालेल्या या शिबिरात ९६ महिलांच्या डोळ्यांची तपासणी झाली. ज्यांना अधिक आवश्यकता असेल, त्यांच्यावर रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी त्यांना रुग्णालयातर्फे एक कार्ड देण्यात आले आहे. कार्डधारकाला आपल्या कुटुंबातील अथवा मित्रमैत्रिणींची मोफत डोळे तपासणी करून घेता येणार आहे.

शिबिराचे नियोजन शिवसागर ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. सायली केतकर, विद्या सावंत, मैथिली पाटील, अस्मिता वाडेकर, मानसी तेरवणकर, पूर्वा सावंत, मनीषा पाटील, संपदा कामत, वर्षा पाटकर, नयना देवरूखकर यांनी केले. साई मंडळाच्या वतीने संतोष सावंत, विवेक चाळके, संतोष लाखण, श्रीकांत बने, विजयकुमार ढेपसे यांनी मदत केली. रुग्णालयातर्फे मंगेश पावसकर, हर्षदा राजापकर, राकेश आंब्रे, साहिल पीरखान, अमित यादव यांनी सहकार्य केले.

(लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजाराविषयी आणि ते होऊ नयेत म्हणून कशी खबरदारी घ्यावी, याविषयी इन्फिगो हॉस्पिटलमधील बालनेत्ररोगतज्ज्ञ दीपक देशपांडे यांनी दिलेली माहिती पाहा सोबतच्या व्हिडिओमध्ये…)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply