Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीत १८, सिंधुदुर्गात २७ नवे करोनाबाधित; रत्नागिरीत २४ तासांत एकही मृत्यू नाही

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ ऑक्टोबर) १८ नव्या रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. अशी परिस्थिती बरेच दिवसांनी आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २७ नवे रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ४५४७ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ ऑक्टोबर) ४३ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७४२७ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९०.६१ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे १८ रुग्ण आढळले. त्यापैकी आठ जण आरटीपीसीआर चाचणीनुसार, तर १० जण रॅपिड अँटिजेन टेस्टनंतर करोनाबाधित असल्याचे नक्की झाले. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – चिपळूण ८ (एकूण ८). रॅपिड अँटिजेन टेस्ट – मंडणगड ८, दापोली १, चिपळूण १ (एकूण १०) (दोन्ही मिळून १८)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८१९६ झाली आहे. बाधितांचा दर १५.२८ टक्के आहे. सध्या ३७१ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. अशी वेळ बऱ्याच दिवसांनी आली आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता ३०२ असून, जिल्ह्याचा मृत्यूदर ३.६८ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८२, खेड ४९, गुहागर ११, दापोली ३२, चिपळूण ७१, संगमेश्वर ३२, लांजा १०, राजापूर १३, मंडणगड २.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१७ ऑक्टोबर) आणखी २७ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४५४७ झाली आहे. आतापर्यंत ३८६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ११७ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या : देवगड ८, दोडामार्ग २, कणकवली ३०, कुडाळ २०, मालवण १२, सावंतवाडी २८, वैभववाडी ७, वेंगुर्ला ९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १

Fest Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version