रत्नागिरीत १८, तर सिंधुदुर्गात केवळ एका नव्या करोनाबाधिताची वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१९ ऑक्टोबर) १८ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८२३१ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज केवळ एका नव्या करोनाबाधिताची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४५८१ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१९ ऑक्टोबर) ३४ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७५७६ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९२.०१ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे १८ रुग्ण आढळले. त्यापैकी १६ जण आरटीपीसीआर चाचणीनुसार, तर दोन जण रॅपिड अँटिजेन टेस्टनंतर करोनाबाधित असल्याचे नक्की झाले. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – खेड २, चिपळूण ४, रत्नागिरी १० (एकूण १६). रॅपिड अँटिजेन टेस्ट – चिपळूण १, रत्नागिरी १ (एकूण २) (दोन्ही मिळून १८)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८२३१ झाली आहे. बाधितांचा दर १५.२५ टक्के आहे. सध्या २५७ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एका मृत्यूची नोंद झाली आहे. लांज्यातील ७२ वर्षांच्या पुरुषाचा १९ ऑक्टोबरला सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या आता ३०५ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.७० टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८२, खेड ४९, गुहागर ११, दापोली ३२, चिपळूण ७२, संगमेश्वर ३२, लांजा ११, राजापूर १३, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१९ ऑक्टोबर) केवळ एका व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४५८१ झाली आहे. आतापर्यंत ३८९५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२० जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या : देवगड ८, दोडामार्ग २, कणकवली ३०, कुडाळ २१, मालवण १३, सावंतवाडी २९, वैभववाडी ७, वेंगुर्ला ९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply