रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२२ ऑक्टोबर) १८ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८२८९ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ४१ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४६८१ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२२ ऑक्टोबर) १५ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७६३९ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९२.१५ टक्के आहे.
जिल्ह्यात आज नवे १८ रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – रत्नागिरी ५. रॅपिड अँटिजेन टेस्ट – मंडणगड ३, दापोली ३, चिपळूण १, रत्नागिरी ६ (एकूण १३) (दोन्ही मिळून १८)
जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८२८९ झाली आहे. बाधितांचा दर १५.०९ टक्के आहे. सध्या २४४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची एकूण संख्या ३०९ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.७२ टक्के आहे.
मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८३, खेड ४९, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७३, संगमेश्वर ३२, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२२ ऑक्टोबर) ४१ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४६८१ झाली आहे. आज ३४ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत ४०२९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२२ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. माणगाव (ता. कुडाळ) येथील एका ७० वर्षीय महिलेचा आज करोनामुळे मृत्यू झाला.
मृतांची तालुकानिहाय संख्या : देवगड ८, दोडामार्ग २, कणकवली ३०, कुडाळ २२, मालवण १३, सावंतवाडी ३०, वैभववाडी ७, वेंगुर्ला ९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १

