रत्नागिरीत १७, तर सिंधुदुर्गात ३४ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ ऑक्टोबर) १७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८२१३ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३४ नवे रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ४५८० झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ ऑक्टोबर) ११५ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७५४२ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९१.८३ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे १७ रुग्ण आढळले. त्यापैकी आठ जण आरटीपीसीआर चाचणीनुसार, तर ९ जण रॅपिड अँटिजेन टेस्टनंतर करोनाबाधित असल्याचे नक्की झाले. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – दापोली २, खेड १, चिपळूण १, रत्नागिरी ४ (एकूण ८). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली २, खेड ४, रत्नागिरी २, लांजा १ (एकूण ९) (दोन्ही मिळून १७)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८२१३ झाली आहे. बाधितांचा दर १५.२४ टक्के आहे. सध्या २७२ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत दोघांच्या मृत्यूची नोंद झाली असून, दोन्ही मृत्यू सरकारी रुग्णालयात झाला आहे. मंडणगडमधील ८० वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू १५ ऑक्टोबर रोजी झाला होता. त्याची नोंद आज झाली. तसेच, चिपळूणमधील ५९ वर्षांच्या पुरुषाचा १७ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता ३०४ असून, जिल्ह्याचा मृत्यूदर ३.७० टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८२, खेड ४९, गुहागर ११, दापोली ३२, चिपळूण ७२, संगमेश्वर ३२, लांजा १०, राजापूर १३, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१८ ऑक्टोबर) आणखी ३४ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४५८० झाली आहे. आतापर्यंत ३८६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२० जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. कुणकेरी (ता. सावंतवाडी) येथील ७४ वर्षांचा पुरुष, पांग्रड (ता. कुडाळ) येथील ४६ वर्षे पुरुष, तसेच मालवण येथील ७२ वर्षांचा पुरुष अशा तिघांचा मृत्यू आज नोंदला गेला आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या : देवगड ८, दोडामार्ग २, कणकवली ३०, कुडाळ २१, मालवण १३, सावंतवाडी २९, वैभववाडी ७, वेंगुर्ला ९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १

Fest Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply