रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी येत्या ६ डिसेंबर २०२० रोजी ऑनलाइन राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी संगमेश्वरचे मनोज जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा द्यायचे रत्नसिंधू कोकण विभाग कलामंचाने ठरविले आहे. त्याकरिता संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुनील सुरेखा यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील नामवंत कवींचे राज्यस्तरीय ऑनलाइन कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावचे सुपुत्र, विश्व समता कलामंचाचे संस्थापक अध्यक्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंचाचे संस्थापक मनोज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन होणार आहे. कविसंमेलन ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गुगल मीटद्वारे सुरू होईल. कविसंमेलनाचे निवेदन आणि सूत्रसंचालन सावर्डे (ता. चिपळूण) येथील प्रतिभावंत कवी आणि निवेदक संदेश सावंत करणार आहेत.
या कविसंमेलनात सहभागी होण्यासाठी 8999494183 किंवा 7840975078 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
