हरवलेली, नष्ट झालेली कागदपत्रे पुन्हा कशी मिळवावीत?

अलीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महापूर आला. त्यामध्ये घरातील अनेक महत्त्वाची
कागदपत्रे नष्ट झाली. हे एक उदाहरण आहे. पण इतरही वेळी अनेक कारणांनी, अपघाताने, पावसामुळे, वाऱ्याने उडून जाऊन कागदपत्रे नष्ट होतात. वाया जातात. ही कागदपत्रे पुन्हा कशी मिळविता येतील, याबाबतची माहिती.

1) शिधापत्रिका :
आपली कौटुंबिक शिधापत्रिका खराब किंवा नष्ट झाली असेल, तर तहसीलदार कार्यालयात दुय्यम रेशनकार्ड मिळण्याबाबत अर्ज सादर करा. त्यानंतर तहसील कार्यालय आपल्याकडील माहितीच्या आधारे आणि धान्य दुकानाच्या ई-रजिस्टरची माहिती आणि स्थानिक अहवालाआधारे दुय्यम रेशनकार्ड वितरित केले जाईल. यासाठी
करावयाच्या अर्जाचा नमुना पुढील लिंकवर उपलब्ध आहे.
http://mahafood.gov.in/website/PDF_files/Namuna15.pdf

२ 7-12, 8अ, फेरफार :
आपल्या जमीनीचे 7-12, 8अ, फेरफार इत्यादी कागदपत्रे खराब, नष्ट झाले असतील, तर गावच्या तलाठ्यांशी संपर्क करून आपला खाते क्रमांक, सर्व्ह नंबर, फेरफार क्रमांक नौंदवुन आपण अर्ज केल्यास ही कागदपत्रे उपलब्ध होऊ शकतात. एखाद्याला आपला खाते क्रमांक, सर्व नंबर, फेरफार क्रमांक माहीत नसेल, तर संबंधित खातेदारांनी आपले नाव, गाव नमूद करनू अर्ज केल्यास त्याआधारेसुद्धा ही कागदपत्रे उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय स्वतः खातेदारसुद्धा https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाइटवरून आपले सात-बारा, आठ-अ पाहू आणि डाउनलोड करून घेऊ शकतात.

३ निवडणूक ओळखपत्र :
आपले निवडणूक ओळखपत्र खराब किंवा नष्ट झालेले असेल तर आपल्या तहसील कार्यालयात जाऊन
तेथे फॉर्म नं. 8 भरून दिल्यावर निवडणूक ओळखपत्र मिळू शकेल. यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना
आपल्याला तहसील कार्यालयात उपलब्ध होईल.

४ बँक पासबुक :
आपल्या बँकेचे पासबुक खराब किंवा नष्ट झालेले असेल्र तर आपले बँक खाते असलेल्या शाखेत जाऊन आपले खाते क्रमांक माहीत असेल तर तो नोंदवून किंवा आपले नाव, गाव इत्यादी माहिती नोंदवून एक अर्ज करावा. त्यानंतर बँक पासबुक उपलब्ध करून देईल.

५ शैक्षणिक कागदपत्रे :
शैक्षणिक कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर मार्कशीट आणि प्रमाणपत्र यांचा
समावेश करता येईल. यापैकी दहावी-बारावीचे मार्कशीट आणि प्रमाणपत्रासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडे अर्ज करून प्राप्त करून घेता येईल. याशिवाय https://boardmarksheet.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवरूनसुद्धा ऑनलाइन पद्धतीने मार्कशीट आणि प्रमाणपत्र मिळविता येईल. पदवी आणि पदव्युत्तर मार्कशीट आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्या विद्यापीठामध्ये अर्ज करून आणि विहित फी भरून ही कागदपत्रे मिळू शकतील.

६. जन्म, मृत्य आणि विवाह प्रमाणपत्र :
आपले जन्म, मृत्यू अथवा विवाह प्रमाणपत्र नष्ट झाले असेल, तर आपण नागरी भागात असाल तर संबंधित
नगरपालिका आणि ग्रामीण भागात असाल तर ग्रामपंचायतीकडे ही कागदपत्रे आपल्याला अर्ज केल्यानंतर उपलब्ध होऊ शकतात. तथापि संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायतीत आपल्याला हव्या असणाऱ्या जन्म, मृत्यू अथवा विवाहाची नोंद पूर्वी केलेली असणे आवश्यक आहे.

इतर शासकीय कागदपत्रे :
७. इतर कागदपत्रांमध्ये घरपत्रक उतारे, शॉप अॅक्ट लायसन्स, खरेदी खत, मोजणी नकाशा, बिनशेती आदेश,
रेखांकन आदेश इत्यादी कागदपत्रे संबंधित कार्यालयात अर्ज केल्यास त्याची नक्कल उपलब्ध होईल.

आधारकार्ड :

आपले आधारकार्ड खराब किंवा नष्ट झाले असेल आणि आपला आधार क्रमांक माहीत असेल तर https://eaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन ई आधार डाऊनलोड करून घेता येईल. आधार क्रमांक माहिती नसेल तर आपण आपल्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जाऊन तेथे एक अर्ज करून आपले नाव आणि अंगठ्याचा ठसा नोंदवून आपले आधारकार्ड प्राप्त करून घेता येईल.

पॅनकार्ड :
पॅनकार्ड खराब किंवा नष्ट झाले असेल तर पॅनकार्डची दुसरी प्रत https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या लिंकवर
ऑनलाइन माहिती आणि विहित फी भरून प्राप्त करून घेता येईल.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply