सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ तासांत तिघा करोनाबाधितांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्यात आज (७ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार तिघा करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.

आज एकूण ४५ हजार ६५९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात २ हजार २७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३७ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

दुबार तपासणी केलेल्या ७ जणांसह आज करोनाचे नवे १३७ रुग्ण आढळले, तर १५२ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ४९ हजार १९९ झाली आहे.

जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १२, दोडामार्ग १, कणकवली १८, कुडाळ २४, मालवण १५, सावंतवाडी ४३, वैभववाडी ३, वेंगुर्ले १४. सक्रिय रुग्णांपैकी ११० रुग्ण ऑक्सिजनवर तर ३० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ३४१, दोडामार्ग ५४, कणकवली ४०७, कुडाळ ५६८, मालवण ३०५, सावंतवाडी २९०, वैभववाडी १२०, वेंगुर्ले १७३, जिल्ह्याबाहेरील १५.

आज जिल्ह्यात ओरोस (ता. कुडाळ), खोटले आणि शिरवडे (ता. मालवण) येथील प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २६५ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६२, दोडामार्ग – ३५, कणकवली – २६४, कुडाळ – १९४, मालवण – २६०, सावंतवाडी – १७२, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply