रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २७ ऑगस्ट) आज ९१ रुग्ण करोनामुक्त झाले, तर १२३ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७२ हजार ७६ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.५५ एवढी आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या १२३ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २११६ नमुन्यांपैकी २०५७ अहवाल निगेटिव्ह, तर ५९ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या १५४३ पैकी १४७९ अहवाल निगेटिव्ह, तर ६४ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७५ हजार ४३३ झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ४६ हजार ९७३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज ९९१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ६९४, तर लक्षणे असलेले २९७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४७८ आहे. संस्थात्मक विलगीकरणात ५१३ रुग्ण असून ८२ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही.
अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले २१६, डीसीएचसीमधील १२५, तर डीसीएचमध्ये १७२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १३३ जण ऑक्सिजनवर, ६५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आधीच्या १२ आणि आजच्या २ अशा एकूण १४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ३.६६ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०३ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर १.४१ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २२८४ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १९१४ (८३.८० टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ८०६ (३५.२९ टक्के) आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली २००, खेड २०१, गुहागर १६२, चिपळूण ४४५, संगमेश्वर २०१, रत्नागिरी ७७०, लांजा १२२, राजापूर १४९. (एकूण २२८४).




