रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ७३ रुग्ण, १२६ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ३ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार १२६ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ७३ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७२ हजार ६२८ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.३५ एवढी आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ७३ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २०३ नमुन्यांपैकी १८० अहवाल निगेटिव्ह, तर २३ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या २०६० पैकी २०१९ अहवाल निगेटिव्ह, तर ५० पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७६ हजार १८० झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ७२ हजार ६०६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज १०७७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ८०१, तर लक्षणे असलेले २७६ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५१५ आहे. त्यापैकी ५६२ जण संस्थात्मक विलगीकरणात असून १२५ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले २८८, डीसीएचसीमधील १२३, तर डीसीएचमध्ये १५३ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ९५ जण ऑक्सिजनवर, ५७ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज दोघा रुग्णांच्या आणि आधीच्या ३ अशा एकूण पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.९५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०८ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२८ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३५० झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २१०, खेड २१३, गुहागर १६६, चिपळूण ४५७, संगमेश्वर २०३, रत्नागिरी ७८६, लांजा १२४, राजापूर १५६. (एकूण २३५०).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply