वैभववाडी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी करोनाचा एकही रुग्ण नाही

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या हळूहळू घटू लागली असून वैभववाडी तालुक्यात आज सलग तिसऱ्या दिवशी एकही नवा रुग्ण आढळला नाही.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (३ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंत करोनाचे ३८ नवबाधित आढळले, तर १०१ जण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार ९७९ झाली आहे.

जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३, दोडामार्ग १, कणकवली ४, कुडाळ २, मालवण ६, सावंतवाडी १४, वैभववाडी ०, वेंगुर्ले ८.

जिल्ह्यात सध्या १४२३ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४५ रुग्ण ऑक्सिजनवर तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १७९, दोडामार्ग ५७, कणकवली २३८, कुडाळ ३५६, मालवण २३९, सावंतवाडी १८७, वैभववाडी ४९, वेंगुर्ले ९५, जिल्ह्याबाहेरील २३.

आज जिल्ह्यात कुवळे (देवगड) आणि कणकवली येथील प्रत्येकी एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय यापूर्वी मरण पावलेल्या एकाच्या मृत्यूची नोंदही आज झाली. त्यांचा तपशील असा – देवगड १, कणकवली २. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३७० झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६९, दोडामार्ग – ३९, कणकवली – २८१, कुडाळ – २२५, मालवण – २७५, सावंतवाडी – १८७, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply