रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१४ ऑगस्ट) नव्या करोनामुक्त झालेल्यांपेक्षा नवबाधितांची संख्या ६० ने अधिक आहे. आज १५७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर ९७ रुग्ण करोनामुक्त झाले.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६९ हजार ९८८ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९४.५८ झाली आहे.
आज आढळलेल्या नव्या १५७ करोनाबाधित रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या चार हजार ५ नमुन्यांपैकी तीन हजार ९४६ अहवाल निगेटिव्ह, तर ५९ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार १८८ पैकी दोन हजार २० अहवाल निगेटिव्ह, तर ९८ पॉझिटिव्ह आले.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७४ हजार झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ९४ हजार २९७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज एक हजार ६७८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ३४६, तर लक्षणे असलेले ३३२ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ९१७, तर ७६१ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून १३९ रुग्णांची पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४२९, डीसीएचसीमधील १३७, तर डीसीएचमध्ये १९५ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १२३ जण ऑक्सिजनवर, ७५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
यापूर्वीच्या १ आणि आजच्या ८ अशा एकूण ९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील ३.१५ हा मृत्युदर घटून तो २.९७ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार १९५ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या एक हजार ८३८ (८३.७४ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७८९ (३५.९५ टक्के) आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली १८९, खेड १९१, गुहागर १५८, चिपळूण ४२४, संगमेश्वर १९२, रत्नागिरी ७४४, लांजा ११८, राजापूर १४५. (एकूण २१९५).
Follow Kokan Media on Social Media

