सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (१ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंत करोनाचे ७३ नवबाधित आढळले, तर ५१ जण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार ९३१ झाली आहे.
जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग ११, कणकवली ६, कुडाळ १४, मालवण ९, सावंतवाडी २१, वैभववाडी ०, वेंगुर्ले ४, जिल्ह्याबाहेरील २.
जिल्ह्यात सध्या १५०८ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४५ रुग्ण ऑक्सिजनवर तर १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १७६, दोडामार्ग ६४, कणकवली २७९, कुडाळ ३६७, मालवण २५४, सावंतवाडी १९९, वैभववाडी ५३, वेंगुर्ले ९५, जिल्ह्याबाहेरील २१.
आज जिल्ह्यात साळशी (दोडामार्ग), तेंडोली (कुडाळ) आणि चाफेखोल (मालवण) येथील प्रत्येकी एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय यापूर्वी मरण पावलेल्या तिघांच्या मृत्यूची नोंदही आज झाली. त्यांचा तपशील असा – दोडामार्ग १, कणकवली १, कुडाळ ३, मालवण १. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३६४ झाली आहे.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६७, दोडामार्ग – ३९, कणकवली – २७९, कुडाळ – २२४, मालवण – २७४, सावंतवाडी – १८७, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media



