सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिकच

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही नवबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (३१ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंत दुबार तपासणी केलेल्या दोघांसह करोनाचे ५३ नवबाधित आढळले, तर ८२ जण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार ८५८ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग २, कणकवली ३, कुडाळ १०, मालवण ७, सावंतवाडी १२, वैभववाडी ६, वेंगुर्ले ३, जिल्ह्याबाहेरील २.

जिल्ह्यात सध्या १४९२ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ५२ रुग्ण ऑक्सिजनवर तर १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १८१, दोडामार्ग ५७, कणकवली २७६, कुडाळ ३५९, मालवण २५९, सावंतवाडी १८७, वैभववाडी ६२, वेंगुर्ले ९२, जिल्ह्याबाहेरील १९.

आज जिल्ह्यात सुकळवाड (मालवण) आणि नानिवडे (वैभववाडी) येथील प्रत्येकी एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३५८ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६७, दोडामार्ग – ३८, कणकवली – २७८, कुडाळ – २२१, मालवण – २७३, सावंतवाडी – १८७, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply