Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी विक्रमी ३३५ रुग्ण करोनामुक्त

pexels-photo-3952231.jpeg

Photo by cottonbro on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (११ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत तब्बल ३३५ रुग्ण करोनामुक्त झाले. नवे २८ रुग्ण आढळले, तर एका रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या एकासह आज नवे २८ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ५२९ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४, दोडामार्ग १, कणकवली ६, कुडाळ ५, मालवण २, सावंतवाडी ९, वैभववाडी ०, वेंगुर्ले १.

जिल्ह्यात सध्या ६१५ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४६ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ४८, दोडामार्ग ३४, कणकवली ११९, कुडाळ १५७, मालवण ९१, सावंतवाडी ९१, वैभववाडी ५, वेंगुर्ले ६५, जिल्ह्याबाहेरील ५.

आज वागदे (कणकवली) येथील एका पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४३३ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७८, दोडामार्ग – ४२, कणकवली – २९६, कुडाळ – २३९, मालवण – २८५, सावंतवाडी – १९६, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १०६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version