सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ६५ करोनाबाधित, २४ करोनमुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२० ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे नवे ६५ रुग्ण आढळले, तर २४ रुग्ण करोनामुक्त झाले.

आज दुबार तपासणी केलेल्या दोघांसह करोनाचे नवे ६५ रुग्ण आढळले. आज बरे झाल्याने घरी गेलेल्या २४ जणांसह आतापर्यंत ४७ हजार १९१ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार ७८८ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार २९७ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १४, दोडामार्ग ३, कणकवली १६, कुडाळ ६, मालवण ३, सावंतवाडी १६, वैभववाडी २, वेंगुर्ले ३.

सक्रिय रुग्णांपैकी ९१ रुग्ण ऑक्सिजनवर तर १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २४८, दोडामार्ग ४२, कणकवली ३३५, कुडाळ ४५४, मालवण २५३, सावंतवाडी २५७, वैभववाडी ६१, वेंगुर्ले १२३, जिल्ह्याबाहेरील १५.

आज जिल्ह्यात घोटगे (ता. दोडामार्ग) आणि सावंतवाडी येथील प्रत्येकी एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय याआधी मरण पावलेल्या ६ रुग्णांची नोंदही आज झाली. त्यांचा तपशील असा – दोडामार्ग १, कुडाळ २, मालवण २, सावंतवाडी २, वेंगुर्ले १. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३१६ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६५, दोडामार्ग – ३६, कणकवली – २७३, कुडाळ – २०७, मालवण – २६५, सावंतवाडी – १८१, वैभववाडी – ७८, वेंगुर्ले – १०२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply