रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या नवबाधितांची संख्या १०० च्या आत

रत्नागिरी : अनेक दिवसांनंतर आज रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधित रुग्णांचा आकडा १०० च्या खाली नोंदविला गेला आहे. बरे झालेल्या रुग्णांची आजची संख्या शंभर असून त्यांचे प्रमाण ९४.७८ टक्के आहे.

जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत होती. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दैनंदिन स्वरूपात आढावा घेण्यास सुरुवात केली. साधारण दररोज एक ते दीड तास याबाबतीत सविस्तर आढावा घेण्याची कार्यवाही सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. एका बाजूला तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्व तयारी केली जात असून दुसऱ्या बाजूला सध्या असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत.

यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून करोनाबाधितांचे होणारे मृत्यू कमी करण्याचेही प्रयत्न जिल्ह्यात सातत्याने सुरू आहेत. अधिकाधिक जणांनी स्वच्छेने याबाबत तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० ऑगस्ट) १०० रुग्ण करोनामुक्त झाले. करोनामुक्तांची एकूण संख्या आता ७० हजार ८६५ झाली असून ही टक्केवारी ९४.७८ आहे. जिल्ह्यातील

आज नवे ९१ करोनाबाधित आढळले असून त्यांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २१२० नमुन्यांपैकी २०६१ अहवाल निगेटिव्ह, तर ५९ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या ११८४ पैकी ११५२ अहवाल निगेटिव्ह, तर ३२ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७४ हजार ७६५ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख २३ हजार ४१८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज १५९८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १२९३, तर लक्षणे असलेले ३०५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ८५५ आहे. संस्थात्मक विलगीकरणात ७४३ जण असून ६२ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४३५, डीसीएचसीमधील १२७, तर डीसीएचमध्ये १७८ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ७१ जण ऑक्सिजनवर, ६२ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एका, यापूर्वीच्या ४ अशा ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ३.१५ टक्के होता. या आठवड्यात तो २.९९ टक्के झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.३१ टक्के आहे.
जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २२४० झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १८७६ (८३.७५ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ८०१ (३५.७६ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली १९५, खेड १९५, गुहागर १५८, चिपळूण ४३४, संगमेश्वर १९५, रत्नागिरी ७६२, लांजा ११९, राजापूर १४८. (एकूण २२४०).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply