रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या नवबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ

रत्नागिरी : अनेक दिवसांनंतर काल रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधित रुग्णांचा आकडा १०० च्या खाली नोंदविला गेला होता. मात्र तो दिलासा एका दिवसाचा ठरला. आज पुन्हा एकदा रुग्णांच्या आकड्याने शंभरी ओलांडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज (२१ ऑगस्ट) १३० रुग्ण करोनामुक्त झाले. करोनामुक्तांची एकूण संख्या आता ७० हजार ९९५ झाली असून ही टक्केवारी ९४.८२ आहे. जिल्ह्यात आज नवे ११६ करोनाबाधित आढळले असून त्यांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १९५६ नमुन्यांपैकी १९१३ अहवाल निगेटिव्ह, तर ४३ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या १७१९ पैकी १६४६ अहवाल निगेटिव्ह, तर ७३ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७४ हजार ८८१ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख २६ हजार ९७७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज १५०५ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १२०४, तर लक्षणे असलेले ३०१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ७७८ आहे. संस्थात्मक विलगीकरणात ७२७ जण असून १३६ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४२६, डीसीएचसीमधील १३१, तर डीसीएचमध्ये १७० रुग्ण आहेत. बाधितांपैकी १४० जण ऑक्सिजनवर, ६८ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ३.१५ टक्के होता. या आठवड्यात तो ३ टक्के झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.३३ टक्के आहे.
जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २२४५ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १८८० (८३.७४ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ८०२ (३५.७२ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली १९५, खेड १९७, गुहागर १५८, चिपळूण ४३५, संगमेश्वर १९६, रत्नागिरी ७६३, लांजा ११९, राजापूर १४८. (एकूण २२४५).
………….

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply