सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२१ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे नवे ४४ रुग्ण आढळले, तर १८२ म्हणजे तिपटीहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.
आज दुबार तपासणी केलेल्या तिघांसह करोनाचे नवे ४७ रुग्ण आढळले. आज बरे झाल्याने घरी गेलेल्या १८२ जणांसह आतापर्यंत ४७ हजार ३७३ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार ६४६ सक्रिय रुग्ण आहेत.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार ३४१ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ३, कणकवली ५, कुडाळ ८, मालवण ४, सावंतवाडी १५, वैभववाडी ७, वेंगुर्ले १.
सक्रिय रुग्णांपैकी ८९ रुग्ण ऑक्सिजनवर तर १५८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २१६, दोडामार्ग ४१, कणकवली २९४, कुडाळ ४२८, मालवण २३५, सावंतवाडी २३०, वैभववाडी ६७, वेंगुर्ले १२०, जिल्ह्याबाहेरील १५.
आज जिल्ह्यात सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथील प्रत्येकी एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय याआधी मरण पावलेल्या २ रुग्णांची नोंदही आज झाली. त्यांचा तपशील असा – कणकवली १, सावंतवाडी १, वैभववाडी १, वेंगुर्ले १. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३२० झाली आहे.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६५, दोडामार्ग – ३६, कणकवली – २७४, कुडाळ – २०७, मालवण – २६५, सावंतवाडी – १८२, वैभववाडी – ७९, वेंगुर्ले – १०३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media

