सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे २५ रुग्ण, तर ८३ जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१३ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत ८३ रुग्ण करोनामुक्त झाले, तर नवे २५ रुग्ण आढळले. दोन रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज नवे २८ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ६०६ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४, दोडामार्ग ०, कणकवली ७, कुडाळ ७, मालवण ४, सावंतवाडी १, वैभववाडी ०, वेंगुर्ले २.

जिल्ह्यात सध्या ५६१ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४२ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ४२, दोडामार्ग २३, कणकवली ११३, कुडाळ १६०, मालवण ९१, सावंतवाडी ७४, वैभववाडी ३, वेंगुर्ले ५३, जिल्ह्याबाहेरील २.

आज आचरा (मालवण) आणि कविलकट्टा (कुडाळ) येथील प्रत्येकी एका पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४३८ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७८, दोडामार्ग – ४२, कणकवली – २९६, कुडाळ – २४०, मालवण – २८६, सावंतवाडी – १९८, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १०७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply